महाराष्ट्राच्या प्रगतीतील समृद्धी महामार्गचे तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना गुरुवार १ ऑगस्ट रोजी पहाटे १ च्या सुमारास गर्डर मशीन आणि क्रेन खाली पडल्याने मोठा अपघात झाला आहे. हे काम ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे सुरू होते. ह्या भयंकर अपघातात १७ कामगारांचा मृत्यु झाला असून अनेकजणांना गंभीर दुखापत झाली आहे. क्रेनच्या साच्याखाली बरेच जण अडकले असून NDRF संघाने आपले बचाव कार्य सुरु केले आहे.
शहापूर उप जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. हा अपघात निष्काळजीपणामुळे झाला असून तेथील नवयुगा इंजिनिअरिंग कंपनीचे स्थानिक काॅन्ट्रॅक्टर आणि गर्डर मशीन चालवणाऱ्या VSL कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झालेल्या प्रकाराबद्दल पंतप्रधान मोदींनी हळहळ व्यक्त केली आणि मृतांच्या कुटुंबीयांना रुपये ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनानेदेखील झालेल्या दुर्घटनेची दखल घेत मृतांच्या कुटुंबीयांना रुपये २ लाखांची मदत आणि जखमींना व्यवस्थित उपचार देण्याचे आदेश दिले आहेत.
अपघाताची तपासणी सुरू केली असून त्यामागील मूळ कारण शोधण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
© Copyright 2023. All Rights Reserved Powered by Vygr Media